नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
शासनाने मुलीसाठी शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, मुलींनी सातत्य राखत चिंतन, मनन करून नियमित अभ्यासाचा ध्यास बाळगून उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन नायगांव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.लत्ता कौठेकर यांनी केले.
त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे महिला शिक्षण दिनानिमित्त तथा सावित्रीबाई फुले जन्मदिनी अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.गीता किरण कदम,सौ. शीला गुरुनाथ इंगोले ,सरपंच किरण कदम, केंद्रप्रमुख मोहन कदम उपस्थित होते
यावेळी प्रथमत: विद्यार्थिनीच्या हस्ते सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक वीरभद्र मिरेवाड यांनी केले. अनुष्का वाघमारे, राधिका डोंगरे, शिवानी माने ,वेदिका माने ,वैष्णवी माने या विद्यार्थिनीने सावित्रीबाई च्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला नवोपक्रम स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झालेल्या शिक्षिका शितल भालेकर यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार सौ.गीता लोकरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत शिंदे, रत्नमला मोरलवार ,माया शिंदे, सुरेश कदम, रत्नप्रभा कोठाळकर, योगिता देशमुख शुभम इंगोले ,संध्या इंगोले ,नंदिनी माने आदींनी सहभाग नोंदविला

COMMENTS