नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुका तलाठी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कर्तव्यदक्ष तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे उदयकुमार मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
तलाठी संघटनेचा कार्यकाळ संपल्याने नव्याने जिल्हाध्यक्ष उदयकुमार मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी मुखेड येथे एका बैठकीचे आयोजन करुण सर्वानुमते मुखेड तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर रातोळीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी डी.रातोळीकर यांचे सत्कार करुण शुभेच्छा दिले.
पुढील कार्यकारणीत कार्याध्यक्ष एस. के देशमुख, उपाध्यक्ष एम. बी.श्रीरामे, सचिव डी.जी कल्याणकर, सह सचिव एम.जी जमदाडे, कोषाध्यक्ष आर जि कापसे,प्रसिद्धी प्रमुख एस.जि शिंदे,संघटक पूजा इंगळे,यु एल देवतळे, सतीश गटलेवार, डी एल भुरेवार, पी आर जाधव, गंगाधर म्हेत्रे, प्रकाश तोटेवाड यांची निवड करण्यात आली.यावेळी नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे सदस्य एल.आर.देशमुख यांची उपस्थिती होती.डी.रातोळीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्या बदल शिवाजी तोत्रे,शेशीकपुर तेलंग,सदाशीव बोयेवार,आदीने अभिनंदन करुण पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

COMMENTS