केज ,(प्रतिनिधी) केज येथील सरस्वती महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक लक्ष्मण पोतन्ना तोंडाकुर यांना हैद्राबाद केंद्रीय विश्वविद्यालया...
केज ,(प्रतिनिधी)
केज येथील सरस्वती महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक लक्ष्मण पोतन्ना तोंडाकुर यांना हैद्राबाद केंद्रीय विश्वविद्यालयाने हिंदी विषयात पीएच डी प्रदान केली या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांनी डॉ भीमसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली समकालीन हिंदी और मराठी उपन्यासों में चित्रित आदिवासी-जीवन का तुलनात्मक अध्ययन हा विषय घेऊन संशोधन कार्य पूर्ण केले .महाविद्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव आदित्य पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.प्राचार्य डॉ जी बी पाटील,प्राचार्य डॉ दादासाहेब मोटे,प्राचार्य डॉ व्ही एस अनिगुंठे ,प्राचार्य एच बी सौदागर ,प्राध्यापक शिक्षेकेत्तर कर्मचारी वृंद आदींनी सत्कार करून अभिनंदन केले आहे .

COMMENTS