आज आज दि.18.12.2020 रोजी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर व औरंगाबाद व लातूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भाजपा शिक्षक आघाडीतर्फे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीच्या
आकृतिबंधाचा अकरा डिसेंबर रोजी चा शासन निर्णय रद्द करावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पुर्णतः अनुदानीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पुढील काळात कायमची व्यपगत करून , प्रतिशाळा प्रतिमाह भत्ता या कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय संपूर्ण शिक्षण व्यवस्था संपुष्टात आणणारा असून राज्यातील सर्व अनुदानीत शिक्षणपद्धती बंद करण्याचे शासनाचे षडयंत्र आहेत . माध्यमिक शाळा संहितेत व सेवाशर्ती नियमावलीतील (1981)अनुसूची 'क' मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती व वेतना संबधित स्पष्ट तरतुदी आहेत , प्रचलीत कायद्यात व नियमावलीत कोणतीही सुधारणा न करता कोणताही मंत्रिमंडळाचा निर्णय न करता असा शासन निर्णय निर्गमित करणे म्हणजे महाराष्ट्रातील हजारो तरुणांना जे रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना कायमचे बेरोजगार करण्यासारखे आहेत . चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे शाळेतील अतिशय महत्वाचा घटक असून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील कणा आहेत .केवळ 5 हजार रुपये अश्या तुटपुंज्या भत्यावर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणे म्हणजे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांच्या शिक्षणाचा व त्यांच्या कार्यक्षमतेचा अपमान करण्यासारखे आहेत .पाच हजार रुपयात आजच्या महागाईच्या काळात उदरनिर्वाह कसा होणार ? या प्रतिशाळा प्रतिमाह भत्त्याच्या रकमेकरिता कोणत्या मापदंडाचा संदर्भ शालेय शिक्षण विभागाने घेतला हे अनाकलनीय आहेत .आशा या शालेय शिक्षण विभागाच्या अफलातून शासन निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला असून शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे 11 डिसेंबर 2020 चा संदर्भाधीन शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.
सदरील आंदोलनात सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी नागरीक यांनी सहभागी होऊन शासनाच्या तुघलकी कारभाराचा निषेध करावा . यासाठी दुपारी तीन वाजता जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभागातर्फे करण्यात येत आहे.
आपले,
प्रा. नितीन कुलकर्णी
मराठवाडा विभाग संयोजक.
भाजपा शिक्षक आघाडी.
विभाग सहसंयोजक
1)विजेंद्र चौधरी बीड
2) रामचंद्र भोसले लातूर
3) एकनाथ राऊत उदगीर
4)दत्ता पडोळे औरंगाबाद
5)सचीन तांबे औरंगाबाद
6 )सौ.ज्योतीताई तुपे.औरंगाबाद
7)अनील मोरे औरंगाबाद
जिल्हा संयोजक.
विनोद राठोड उस्मानाबाद, नागनाथ खिंडे लातूर,हावगीराव गोपछडे नांदेड, गजानन कुटे हिंगोली, राजीव अंबेकर नांदेड महानगर,अरुण वडकर परभणी,लखन जाधव परभणी महानगर,बन्सी हावळे बीड, संजय भातलवंडे जालना, योगेश जगताप औरंगाबाद महानगर, भालेराव आर.डी. औरंगाबाद, वैजनाथ होळे लातूर महानगर.

COMMENTS