केज/प्रतिनिधी स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक २०,२१,२४ डिसेंबार २०२० रोजी संत ग...
केज/प्रतिनिधी स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दिनांक २०,२१,२४ डिसेंबार २०२० रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी,संत रोहीदास महाराज पुण्यतिथी,साने गुरुजी जयंती निमित्त वसुदेव(बप्पा)गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. दिनांक ३०-१२-२०२० रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी वसुदेव(बप्पा)गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या वेळी व्याख्यान,ग्रंथप्रदर्शन घेण्यात आले. यावेळी कोळसे रुक्षीकेश,गायकवाड शिवप्रसाद यांचे व्याख्यान संपन्न झाले.तर ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमात गायकवाड रमेशराव,आनंद(भैय्या)गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.व्याख्यान व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप वसुदेव(बप्पा)गायकवाड यांनी काला. दिनांक २१-१२-२०२० रोजी संत रोहीदास महाराज पुण्यतिथीसाजरी करण्यात आली.यावेळी उत्स्फुर्त भाषण घेण्यात आले.सुनंदा शिंदे,वैष्णवी गायकवाड ,सानिका गायकवाड ,आनंद (भैय्या)गायकवाड ,उमाकांत गायकवाड ,बाळासाहेब गायकवाड यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुञसंचलन,आभारप्रदर्शनृ वसुदेव(बप्पा)गायकवाड यांनि केले. दिनांक २४-१२-२०२० रोजी साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी व्याख्यान व कथाकथन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आनंद (भैय्या)गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.तर बाळासाहेब गायकवाड ,प्रकाश गायकवाड ,गोवर्धन तट यांनी साने गुरुजींच्या विविध कथांचे सादरीकरण केले.अध्यक्षीय समारोप वसुदेव(बप्पा)गायकवाड यांनी केला.सर्व कार्यक्रमात युवक,जेष्ठ नागरीक,किशोरी,विद्यार्थी सहभागी झाले होते.

COMMENTS