.
नायगांव प्रतिनीधी ( रामप्रसाद चन्नावार )
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नायगावात विविध व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद नोंदविला तर विविध पक्षांच्या पदाधिकारी यांनी केंद्र सरकार विरोधी शेतकरी वर्गांच्या लढ्याला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्यासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत असून सरकार काही शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकायला तयार नाही म्हणून शेतकऱ्याच्या लढ्याला महाविकासआघाडी, वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी पक्ष, कष्टकरी संघटना व रिपब्लिकन सेना, हिंदू युवा परिषदनेही पाठिंबा दर्शवून भारत बंदला नायगावात प्रतिसाद नोंदविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे कंपनीकरण करून भांडवलशाहीच्या घशात शेतकऱ्यांच्या जमिनी घालण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे व शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून त्यांना गुलाम म्हणून बनविण्याचे केंद्र सरकारचे हे फार मोठे षडयंत्र आहे असे पाठिंबा दर्शविलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांचे केंद्र सरकारवर हल्लाबोल करीत आपण यापूर्वीही व यापुढेही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत म्हणून या भारत बंदच्या लढ्यात सहभागी आहोत असेही अनेकांनी मत मांडले आहे.

COMMENTS