मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील चिंचोली पाटी जवळील असलेल्या युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत अक्षय बालगृह गेल्या १२ वर्षापासून बीड जिल्ह्यातील अनाथ,बेवारस, एकपालक काळजी व स्वरक्षणाची गरज असलेल्या मुला मुलांचा सांभाळ करत आहे अशा या बालगृहात संस्थे अंतर्गत चालत असलेल्या प्रकल्प चाईल्ड ला ई न टोल फ्री नं. १०९८ वरून आलेल्या तक्रारी ची मुले राहत आहेत. ज्या मुलांना काळजी व स्वरक्षणाची गरज आहे.
अशा मुलामध्ये सहभागी होऊन शुभम भैय्या रांजणकर यांनी दिनांक ८ डिसेंबर मंगळवार रोजी आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला सध्याच्या धावत्या युगात युवा पिढी आपले वाढदिवस खूप मोठ्या हॉटेल मध्ये साजरे करतात परंतु शुभम भैय्या यांनी समाजाची जान राखून आपला वाढदिवस हा युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत चालत असलेल्या अक्षय बालगृहात अनाथ मुलामध्ये उत्साहात साजरा केला ही खरच अभिमानाची व सामाजिक बांधिलकीची बाब आहे की
सर्वात पहिले केक कापून शुभम भैय्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शुभम भैय्या यांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजाबद्दल असलेली त्यांची जबाबदारी व बांधिलकी सांगितली व सर्व मुलांना फळे खाऊ व शालेय साहित्य वाटप केले
यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष – बी के कापरे कार्यकारी सचिव - एच पी देशमुख लेखापाल – संतोष रेपे वाहन चालक – संभाजी वळसे, विद्यार्थी रोहित जाधव,अक्षय पांचाळ, बिपीन भावठाणकर, यश भावठाणकर, अभिषेक देवधारे, साहिल रांजणकर , पत्रकार अनंत जाधव,मंथन पारशेष्ठी,ऋषिकेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.


COMMENTS