सात कोटीचा गुरुजी रणजीतसिंह डीसलेची फिनिक्स भरारी, ग्लोबल शिक्षक पुरस्काराने नायगावात मित्रत्वाकडून उभारी.

   नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार )            मित्रत्वाचे नाते म्हणजे एक जिव्हाळ्याचे अतूट नाते एवढे रसाळ असते की, जणू काय त्याला तो...


   नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार )

           मित्रत्वाचे नाते म्हणजे एक जिव्हाळ्याचे अतूट नाते एवढे रसाळ असते की, जणू काय त्याला तोडच नाही. मित्रत्वाच्या नात्यात राग, लोभ, प्रेम असते, पण काही कालांतराने आपला जिवलग मित्र यशाचे शिखर गाठतो तेव्हा आपल्या मित्राला त्यांनी गाठलेल्या उंचीवरून हाच आनंद द्विगुणीत होतो एवढे मात्र नक्की. रणजितसिंह डीसले यांच्या ग्लोबल शिक्षक या पुरस्काराने त्यांचा डीएडचा मित्र नायगांव येथील सामाजिक कार्यकर्ते कैलाश भालेराव यांचा आनंद गगनाला भिडला आहे.

     सद्यस्थितीत देशात सर्व प्रसार व प्रचार माध्यमावर रंजितसिंह डीसले यांनी मिळविला बहुमान सर्वांसाठीच प्रेरणादायी व आदर्शवादी बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डीसले यांनी जगाला सांगून दिले की शिक्षकांनी ज्ञानदान कसे दिले जावे, जगभरातील 140 देशातील बारा हजाराहून शिक्षकांच्या नामाकंन यादीतून अंतिम विजेता म्हणून रंजीतसिंह डिसले गुरुजी ची घोषणा करण्यात आली. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ग्लोबल शिक्षक हा सात कोटीचा पुरस्कार मिळालेला आहे, जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डीसले गुरुजीचा सन्मान झालेला असताना भारताला पहिल्यांदाच हा सन्मान मिळाल्यामुळे विविध पक्षाची दिग्गज नेते मंडळी यांनी त्यांचे तोंडभरून अभिनंदन करीत असून कित्येक लोकप्रतिनिधी, अधिकारी, सिनेकलावंत अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत, तर एकीकडे डीसले सोबत राहिलेले, मनमुराद गप्पा गोष्टी केलेले, एकत्र हसणे, खेळणे,बागडणे असे कित्येक जिवलग मित्रा पैकी नायगांव येथील त्यांचे सच्चे मित्र कैलास भालेराव व रणजितसिंह डीसले यांनी वडाळा उत्तर-सोलापूर येथे 2005 ते 2007 मध्ये डीएडचे वर्ग मित्र म्हणून एकत्र राहिले होते, त्यांच्यातून जमलेली त्यांची मित्रत्वाची गाठ कधीच एकमेकाला न विसरणारी ही याराना जोडी आपापल्यापरीने प्रगतीच्या वाटेकडे जाता जाता एकानी सामाजिक काम हाती घेतले तर एकानी शिक्षण क्षेत्रात यशाची फिनिक्स भरारी घेतली असून रणजितसिंह डीसले यांच्या विषयी असलेलं कैलास भालेराव यांचे प्रेम व या उत्सुंग भरारी मुळे आमची उभारी प्रिय मित्रा तुझ्या सोबत म्हणून भालेराव यांचा आनंद गगनाला भिडलेला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group