_____________________________
बीड जिल्ह्य़ातील प्रामुख्याने गेवराई, माजलगाव, आष्टी, केज ,बीड तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळु उपसा होत आहे,वाळु टेंडर नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा वाळूमाफिया महसुल व पोलीस प्रशासनाच्या मदतीशिवाय करणे शक्यच नाही, त्यामुळेच संबधित प्रकरणात अवैध वाळूउपसा होत असलेल्या महसूल व पोलीस प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून करावी व वाळु टेंडर सुरू करण्यात यावेत अशी मागणी गौणखनिज आधिकारी,जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
महसुल व पोलीस प्रशासनाची मजा आणि घर बांधनारांना सजा का?:- डाॅ.गणेश ढवळे
______________________________ वाळू टेंडर नसताना दररोज वाळुचे टीप्पर भरून जाताना दिसतात, महसूल व पोलीस प्रशासनातील काही आधिका-यांचे वाळुमाफियांशी संगनमत असल्याशिवाय हे शक्यच नाही याची चर्चा जिल्ह्याभरात जोरात सुरू आहे, नदीपात्रात वाळू शिल्लक रहात नाही,शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूलही बुडतो आहे आणि सामान्य माणसाला घरबांधणीसाठी तिप्पट ज्यादा दराने वाळू खरेदी करावी लागत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरळ सरळ वाळू टेंडर सुरू करावेत
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

COMMENTS