नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
आपण अनेक वेळा ऐकतो, बोलतो की,जगामध्ये ईमानादारी राहिली नाही.ईमानदारी लोप पावत चालली आहे. स्वार्थी व लबाडी लोकांची संख्या मोठया प्रमाणावर दिवसागणिक वाढत असल्याचे अनेक वेळा आपण चर्चेतुन ऐकायला मिळते.परंतू आज घडीला जगामध्ये प्रामाणिक व ईमानदार लोकांची संख्या कांही का असेना वीस ते पंचवीस टक्के असल्याने या लोकांवर जग टिकुन आहे. असाच प्रत्यय गडगा ता.नायगांव येथील विलास मोहनराव पाटील कॉग्रेस चे कार्यकर्ते, भारत इलेक्ट्रीकल्सचे मालक सयद जमिल, उपसरपंच शेख मिरा पटेल केळी विक्रेत्या ताईनी घडवून व दाखवुन दिले. स्टुडिओ कॅमे-याची मिळालेली बॅग परत केली.नर्सी मार्गे दुचाकी वरुन मुखेडकडे जात असताना गडगा ता.नायगांव येथे गतिरोधकावर आदळुन कॅमेरा व बॅग भारत इलेक्ट्रीकल्स दुकानच्या पुढील रस्तयावर पडल्याने येथील कॉग्रेसचे कार्यकर्ते विलास मोहनराव पाटील, उपसरपंच शेख मिरा पटेल, भारत इलेक्ट्रीक्सचे चालक सयद जमिल यांच्या निर्दशनास आल्याने त्यांनी हि बॅग घेउन आपल्याकडे ठेवली.
कुंडलवाडी येथील पत्रकार गणेश कत्रुवार यांनी मुखेड पासुन नर्सी दरम्यान प्रत्येक स्पीड बेक्रर व स्टॉपवर येवून चौकशी करत करत अखेर गडगा येथे येवून रोडवरील केळेवाली ताई इंदरबाई गणेशराव इबितदार यांच्याकडे चौकशी केली की या ठिकाणी आमची स्टुडिओ कॅमे-याची बॅग पडली काय असे विचारणा करुन बॅग चे वर्णन सांगितले असता त्यांनी पूर्ण ऐकुन घेऊन सदर बॅग रस्त्यावर पडली होती या वेळी सयद जमील, विलास मोहनराव पाटील,उपसरपंच शेख मिरा पटेल यांच्याकडे बॅग असल्याचे सांगुन भेटुन घालुन दिले असता विलास पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता कसलीही अपेक्षा न करता उलट चहापाणी करुन बॅग परत करुन जगात हरवलेल्या माणसुकीचे जतन करुन प्रामाणिकपणा व इमानदारी शिल्ल्क असल्याचे दाखवुन दिले.
COMMENTS