नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तालुक्यातील नरसी येथे दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त मोठी यात्रा भरते त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षीची यात्रा म्हणजेच दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्त होत असलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले असून पाच मानकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळा करण्याचा निर्णय खंडोबा मंदीर कमिटीच्या वतीने घेतला आहे.
ही पालखी पांडुरंग महाराज पाटे यांच्या निवास्थानापासून निघणार असून ती नरसी जुण्या गावातून भंडारा डोंगर जाग्रत देवस्थान मंदीराकडे जाणार आहे.
नरसी येथील भंडारा डोंगर जागृत देवस्थान श्री खंडोबा मंदिराची दूर-दूर ख्याती आहे. या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी दरवर्षी चंपाषष्ठीला इथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक दर्शनासाठी येतात व अनेक प्रकारचे दुकाने येतात यावर्षी कोरोणामुळे यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करावेत अशा सूचना प्रशासनाने दिल्यानंतर खंडोबा मंदिर चे महाराज पांडुरंग महाराज पाटे, कमिटीचे अध्यक्ष माधवराव वडजे, उपाध्यक्ष मारोतराव वडगावे, सचिव हणमंतराव कोकणे, किसन खणपटे ,माधवराव मेकाले, संग्राम मुगावे, शिवाजीराव नारे, पांडुरंग बागडे, गोविंद टोकलवाड नरसीकर यांनी निर्णय घेत फक्त पालखी सोहळा पाच मानकऱ्यांच्या उपस्थित घेण्याचे व खंडोबाचे दर्शन सर्व नियम पाळून करण्याचा निर्णय घेतल्याने नरसी येथील खंडोबा यात्रा साधेपणाने साजरी होणार आहे.

COMMENTS