नांदेड,प्रतिनिधी दि 4 डिसेंबर
जागतिक मृदा दिनाचे निमित्त साधून छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शनिवार 5 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता, राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्र लिंगापूर ता.हदगाव येथे आयोजित केली असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माती परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची काळजी व जमिनीचा आरोग्य व्यवस्थापन त्याचबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर मूलभूत गोष्टीची जी कमतरता आहे त्याविषयी सखोल माहिती जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे काळाची गरज बनली आहे, शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टीची सखोल माहिती व्हावी व आपल्या शेतामध्ये कोणती खते अन्नद्रव्य वापरावी याकरता सविस्तर माहिती मिळावी यासाठीच राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राच्या वतीने या प्रशिक्षन शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी माती परीक्षण केंद्राचे कर्मचारी,मृदा शास्त्रज्ञ, कृषी विभागातील कर्मचारी व तज्ञ उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती, प्रशिक्षण देणार आहेत, कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत देवसरकर, माती परीक्षण केंद्राचे कर्मचारी महेश पाटील गोरेगावकर,अमोल देवसरकर,अनिल देवसरकर, ज्ञानेश्वर पाटील संदीप जाधव,नंदू पाटील नरवाडे आदींनी केले आहे.

COMMENTS