मुंबई - आपण आनंदी आहोत असं वाटणं वेगळं आणि प्रत्यक्षात असणे वेगळे, आहे त्या परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाण्यासाठी असणारी कणखर मानसिकता प्रत्येकाकडे असते असे नाही. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणा-या तारक मेहता का उल्टा चष्माचे लेखक यांचे निधन झाले आहे.
दुस-यांना सतत हसविणारा आतून किती दुखी असू शकतो याची कल्पना तारक मेहता का उल्टा चष्माचे लेखक अभिषेक मकवाना यांच्याकडे पाहिल्यावर कळते. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आपल्यावर असणा-या आर्थिक समस्यांच्या ओझ्यामुळे अशाप्रकारचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहेदुसरीकडे एका बड्या कंपनीच्या कर्जप्रकरणात ते अडकले असल्याची चर्चा आहे. त्या कंपनीच्या वतीनं त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता. त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. हे त्यांच्या मृत्युसाठी प्रमुख कारण असल्याचेही म्हटले जात आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या काही लेखकांपैकी एक म्हणून अभिषेक यांची ओळख होती. विशेष म्हणजे त्यांना एका कंपनीच्या नावाने फोन आला होता. तो फोन कर्ज देण्याविषयी होता. अभिषेक यांच्यासोबत जो प्रकार झाला त्याला अशाच प्रकारचा एक फेक कॉल कारणीभूत होता. याबाबत अधिक माहिती देताना अभिषेक यांचे भाऊ जेनिस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून अभिषेक हा तणावाखाली दिसत होता. त्याचे मेल वाचल्यावर तो अडचणीत सापडल्याचे दिसून आले. मला त्याच्या गेल्यानंतर अनेकांचे फोन आले ते सगळे त्यांचे पैसे देण्याकरिता होते.
पैसे देण्यास विलंब होत असल्याने अनेकांनी मला शिवीगाळ केली. मला ती ऐकून घ्यावी लागली. 27 नोव्हेंबर रोजी अभिषेक घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडून एक सुसाईड नोट सापडली होती. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS