केज/प्रतिनिधी
. केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे शाळा बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असून हंगामी वस्तीगृहात अनियमिता असलेचे जिवाची वाडीच्या सरपंच श्रीमती कुसूम संदिपान कुटे यांनी कार्यालयास तक्रार देताच शिक्षण विभागाचे , जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , नवनाथ सोनवणे व केंद्रप्रमुख लव्हूरी तोंडे सर यांनी दि.२ रोजी ०८ : ३० वाजता जि.प. उच्च प्रा . जिवाची वाडी शाळेस भेट देऊन शाळा व्यावस्थान समिती अध्यक्ष , भगवान चौरे व सरपंच , माझी सरपंच यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला या वेळी शाळेत एकही शिक्षक उपस्थित नव्हते तसेच हंगामी वस्तीगृह बंद असून जिवाची वाडी हायस्कूल जिवाची वाडी शाळेचे मुख्याधापक रमेश चौरे यांनी२३ विधार्थी संमभाव्य परस्पर दाखविलेचे पत्र देऊन कळविले . जि.प. उच्च प्रा. जिवाची वाडी शाळेचे मुख्याधाप , ठोंबरे विक्रम सखाहरी नेहमी अनुउपस्थित असतात कधी आलेच तर मधपान करूण पूर्णवेळ नशेत असलेचे उपस्थितांन कडून सांगण्यात आले . यामुळे ठोंबरे यांचे कोणत्याही शिक्षकांन वर नियंत्रण नाही . चौकशी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले की शाळेची गुणवत्ता ढासळली व हंगामी वस्तीगृहात अनियमिता असले बाबदचा अहवाल यापूर्वी ही सन -२०१९-२० गट साधन केंद्र, केज कार्यालयात पाठविलेचे सांगून कार्यवाही नझालेचे पंचनाम्यात नमूद केले .एकही शिक्षक उपस्थित नसले ने शाळा बंद असलेने वस्तीगृहाचे व शाळेचे कोणतेही अभिलेखे तपासणी वेळी उपल्बद नव्हते .
शाळा बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असून त्याची तपासणी गुण नियंत्रण कार्यालया मार्फत करावी अशी उपस्थितांनी मागणी केली असून बांधकाम व वस्तीगृह याचे सर्व कामकाज आणि व्यावस्थापन या गावचे मुळ राहिवाशी सहशिक्षक तथा लव्हूरी केंद्राचे प्रभारी मुख्याध्याक श्रीराम चाटे पाहात असलेचे सांगीतले , चौकशी अहवालावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , भगवान चौरे , सरपंच , श्रीमती कुसूम कुटे , मुख्याधापक , रमेश चौरे , महादेव उर्फ बाबा चौरे , चिंतामण चौरे, महादेव रामकिसन , डिगांबर चौरे, सचिन चौरे इत्यादिंच्या स्वाक्षऱ्या आहेत .
आमच्या प्रतिनिधीने मुख्याध्यापक विक्रम ठोंबरे यांच्याशी मोबाईफोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद दिसुन आला.

COMMENTS