बीड (प्रतिनिधी) दि.०८
केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे केल्याच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात देखील बंद पाळण्यात आला यामध्ये सर्वपक्ष बंद मध्ये सहभागी होते बीड जिल्हा कचोरी समोर धरणे निदर्शने करण्यात आली व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली बुधवारी केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात चर्चा होणार आहे. परंतू शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी आज भारत बंदचे आवाहन केले होते. सकाळ पासूनच बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात बंदमध्ये सहभागी होवून व्यापाऱ्यांनी आपला पाठींबा दर्शविला. अनेक ठिकाणी धरणे आणि निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. बीडमध्ये वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी किसान सभा आणि सुशीला मोराळे भारतीय शेतकरी कामगार पक्ष आदीचे आंदोलन संपन्न.
केंद्रातील सत्ताधारी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असून सरकारच्या या धोरणाविरूद्ध देशातील शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देताना भारतीय शेतकरी कामगार पक्ष, बीड जिल्हा राष्ट्रवादी किसान सभा आणि सुशीलाताई मोराळे, वंचितचे बहुजन आघाडी, काँग्रेसचे डॉ.इद्रिस हाश्मी, कुलदीप करपे, मोहन जाधव,दादासाहेब मुंडे,राजेश शिंदे, पंडित तुपे अजय सरवदे, पुष्पा तुरुकमाने, सारिका गायकवाड, किरण वाघमारे,आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा कचेरी समोर होते.
बीड जिल्हा कचेरीसमोर
आंदोलकांनी आपले ठाण मांडले, बुधवारी केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात चर्चा होणार आहे. परंतू शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. सकाळ पासूनच बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात बंदमध्ये सहभागी होवून व्यापाऱ्यांनी आपला पाठींबा दर्शविला. अनेक ठिकाणी धरणे आणि निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून शेतकरी व कामगारांच्या विरोधात केलेले कायदे लवकरात लवकर परत घ्यावेत अशी मागणी करण्यात आली,यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले जर शेतकऱ्यांचे व कामगारांचे नवीन जाचक कायदा रद्द झाले नाही तर भविष्यात याहीपेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
चौकट
बीड शहरातील व्यापाऱ्यांनी व्यापारपेठ बंद ठेवून शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला मोठा सहकार्य केलं
कुठलाही अनुचित प्रकार या बंद दरम्यान घडला नाही.
अत्यावश्यक सेवेची दुकाने चालू होती.
दुध व्यावसायिक व अत्यावश्यक सेवेतील औषधाची दुकाने चालु होती व कार्यालयीन कर्मचारी यावेळी रस्त्यावरून गाड्यांची, टू व्हीलर ची वाहतूक दिसत होती.

COMMENTS