नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुकयातील मौजे राजूरा (बु) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे शाळेतल्या वर्ग खोल्या ह्या अतिशय ओसाड, पडझड अवस्थेत पडलेल्या आहेत प्रत्यक्ष वर्ग भरवण्यासाठी उघड्यावर शाळा भरवून अध्यापण करावे लागत आहे. मुलांना पिण्याच्या पाण्याची , शौचालयाची व्यवस्था देखील नाही इतकी दयनीय अवस्था राजुरा जिल्हा परिषद शाळेची झाली आहे एकीकडे शासन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन सर्वांगींण विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असताना राजुरा बु. येथिक शाळेची अवस्था विदयार्थ्यांना जीवघेणी भयावह होत आहे. मुले वर्गात ज्ञानार्जनासाठी बसले तर कधी कोणते पत्रे मुलांच्या अंगावर पडतील की काय याची भिती मनात ठेऊनच जीव मुठीत धरून वर्गात बसावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन याकडे लक्ष देऊन शाळेची ईमारत बांधेल कि शिक्षणाच्या नावाखाली शिक्षण व्यवस्थेचा फज्जा उडवेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

COMMENTS