जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
हिंदु धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा (कार्यक्षेत्र भारत ) या संघटनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदि विठ्ठल गिरी तर जिल्हा उपाध्यक्ष पदी सतीश पुरी यांची निवड सोमवारी आठवे ज्योतीर्लींग असलेल्या औंढा नागनाथ या पावण भुमीत चिंतामणी महादेव मंदिरात करण्यात आली.
हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. कृष्णदेव गिरी, राज्य महामंत्री संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष व्यंकटेश पुरी व मराठवाडा महामंत्री राजेंद्र गिरी यांच्या सुचने वरून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष महेंद्र पुरी यांनी सोमवारी हिंगोली जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुनिल भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या निवडीबद्दल गोसावी समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच उर्वरित पदाधिकारी व पाचही तालुका कार्यकारणी गठीत करण्यात येणार असल्याचे नुतन जिल्हाध्यक्ष विठ्ठल गिरी यांनी सांगितले.


COMMENTS