पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली

 मुंबई, 24 डिसेंबर: मुंबईतील पोलिस विभागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे.सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये ही काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर असताना आयुष्य संपवलं आहे. सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सखाराम भोये 2003 च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. 2016 पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. बुधवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्रपाळी संपून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी सरकारी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली.



टिप्पण्या