नांदेड
सन 19- 20 या वर्षाच्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या 6900 शिक्षक खातेदारांच्या अद्यावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे संबंधित तालुक्यांच्या गट विकास अधिकारी /गट शिक्षण अधिकारी यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या हस्ते वितरित केल्या आहेत. या विवरण पत्रांमध्ये ,ज्या महिन्यांमध्ये वर्गणी दर्शवण्यात आली नसेल ,अशा महिन्याची जीपीएफ ची शेड्युल ची कपात प्रत वित्त विभागात सादर केल्यास सुधारित प्रत तात्काळ निर्गमित केली जाईल. संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयांनी त्यांची अधिनस्त सर्व शाळेतील शिक्षकांना या भविष्य निर्वाह निधी च्या स्लीप वितरित कराव्यात आणि उलट टपाली त्याची पोच विभागात सादर करावी. तालुक्या कडून नियमितपणे दर महा शेड्युल प्राप्त झाली तर हे काम आणखीन कमी वेळात होऊ शकेल.

COMMENTS