केज / प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे ६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथममहापरिनिर्...
केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे ६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथममहापरिनिर्वाणदिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर गौरउदगार काढण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सुनील देशमुख, उपसरपंच पवन पवार, सदस्य आशोक शिंदे, अप्पा घोडके, महादेव घोडके, रवि गलांडे, नारायण नखाते, अमर घोडके, संजय घोडके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

COMMENTS