" अनेक भावी सरपंच हॉटेल समोर नागरिकांना चहा - नास्ता करण्यात व्यस्त "
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार आहेत . विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत
आहेत . निवडणुकीच्या गप्पा गावातील बाजार पेठेत हॉटेलात, पारावर,बसस्थानक येथे सुरु असून अनेकांनी निवडणुकीची तयारी कागदोपत्री जमवाजमवी सुरु केली आहे. कांही भावी सरपंच हॉटेल समोर थांबून आता पासूनच गावातील नागरिकांना चहा - नास्ता करण्यात व्यस्त दिसत आहे.
निवडणूक विभागाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध हि केली . सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले असून अंतिम मतदार यादी दहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे . त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आतापासून तयारी सुरू झाली आहे . गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश जारी करून शासनाकडून येणारा कोट्यवधी रुपयाचा निधी हा ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांना व ग्रामपंचायत स्तरावर खर्च करण्याचे अधिकार दिले असल्यामुळे सरपंच पदाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे . त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर आपले नातेवाईक , सोयरे धायरे , भाऊकितील कटुता विसरून बंधुत्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत . सर्व मित्रमंडळीशी गावातील ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क
साधून . मी कसा या सरपंच पदाचा उमेदवार चांगला होतकरू प्रामाणिक काम करणारा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत . गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उपस्थिती लावून .लोकांप्रती आपुलकी दर्शविण्यासाठी इच्छुक तयारी करीत असल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा मात्र आंबुलगा (बु) येथे जोरात होत आहे .

COMMENTS