महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार*. *महावितरण कंपनीच्या अधिकार्‍याकडे वारंवार चकरा मारून सुध्दा शेतकऱ्याला न्याय मिळेना* .

*अनंत जाधव /मस्साजोग *   केज तालुक्यातील मस्साजोग येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदराव गुलाबराव देशमुख यांनी दिनांक. 27/01/ 2015 रोजी शेतातील वि...

*अनंत जाधव /मस्साजोग* 

केज तालुक्यातील मस्साजोग येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदराव गुलाबराव देशमुख यांनी दिनांक. 27/01/ 2015 रोजी शेतातील विज जोडणीसाठी सहा हजार दोनशे रुपये‌ भरून सुद्धा मस्साजोग येथील* शेतकऱ्याला 5 /12 /2020 पर्यंत वीज जोडुण मिळाली नसल्यामुळे आनंदराव गुलाबराव देशमुख हे दोन्ही कानाने कर्ण बधीर असल्याने व सुशिक्षित नसल्यामुळे त्यांनी महावितरण कार्यालयात वारंवार चकरा मारून कर्मचारी व अधिकार्याशी वीज जोडणी संदर्भात वारंवार विचारपूस केली पण महावितरण कार्यालयातील अधिकार्याने व कर्मचार्यांनी 2015 पासून वीज जोडुन दिली जाईल असे नुसते आश्र्वासन दिले पण अद्यापही या शेतकऱ्यांला महावितरण कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी व कर्मचार्यांनी वीज जोडुण देण्यास टाळाटाळ केल्यामुळे व शेतामध्ये लाईट नसल्यामुळे आता पर्यंत या शेतकऱ्याच्या शेतामध्ये झालेल्या नुकसानीला महावितरण कंपनी जबाबदार राहणार का ?असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यामध्ये उपस्थित झाला आहे.  


 मुलगा भारतीय सैन्यदलात नौकरी करत असल्यामुळे त्याच्याकडे पण सुट्टी अभावी वीजजोडणी संदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचा-याला विचारपूस करण्या करीता मुलाला वेळ मिळाला नाही पण त्याचा मुलगा सैन्यदलातून निवृत्त होऊन गावाकडे आल्यानंतर शेतकरी व त्याचा मुलगा 26 सप्टेंबर 2020 रोजी केज येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये शेतातील वीज जोडुण देण्या अगोदरच आम्ही आमच्या शेतामध्ये कसल्याही प्रकारे लाईटचा वापर न करिता चक्क 66 हजार 900 रूपयांचे एवढ्या मोठ्या रकमेचे बील कसे काय दिले या संदर्भात महावितरण कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले असता अधिकार्यांने संबंधित शेतकऱ्याची तक्रार ऐकून न घेता संबंधित शेतकऱ्यांला 26 नोव्हेंबर 2016 पासून ते अद्याप पर्यंतचे ,66 हजार 900/- रुपयांचे बील शेतकर्याला महावितरण कंपनीकडून चक्क एवढे मोठे रक्कमेची विज बिल पावती देण्यात आली व त्यानंतर लाईनमन व सहाय्यक अभियंता या दोघांनी प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर केला असता त्यांना देखील शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे वायर किंवा लाईट आढळून आलेली नाही अशा प्रकारचा अहवाल त्या दोघांनी दिनांक 8/10/ 2020 रोजी दिलेला आहे.तरी महावितरणाच्या अशा भोंगळ कारभारामुळे अल्पभूधारक शेतकरी व भारतीय सेनेतील जवान या दोघांवर संबंधित कार्यालयाकडून अन्याय झाल्यामुळे शेतकरी व भारतीय सेनेतील जवानांला फक्त जय जवान जय किसान ही घोषणा केवळ कागदावर राहिलेली आहे कारण दोघांना पण अन्याय सहन करावा लागला आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांकडून महावितरणाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी व गुत्तेदारावर योग्य दखल घेऊन महावितरण प्राशासनाकडून कारवाई करण्यात यावी व संबंधित शेतकर्‍यांची वीज जोडणी करून देण्यात यावी व वीजजोडणी न करीता 66 हजार 900 रुपये आलेले वीज बील संबंधित शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीकडून पंधरा दिवसांच्या आत माफ करण्यात यावे अन्यथा संबंधित शेतकरी व त्यांचा मुलगा केज येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तरीही संबंधित शेतकऱ्याच्या जीवाचे बरे वाईट काय झाल्यास त्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group