नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
शिक्षक सेना जिल्हा शाखा मुखेडची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष संतोषजी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली.शिक्षक सेना शिक्षकांचे विविध प्रश्न निर्भयतेने,सतत पाठपुरावा करुन सोडवुन घेते.सध्या शिक्षक सेनेला शिक्षकांचा प्रचंड प्रतीसाद मिळत आहे.जिल्हाध्यक्ष अंबुलगेकर यांनी आपल्या सर्व टीमच्या सहकार्यातुन नवीन रुप आणले आहे.या वेळी या टीमला अधिक भक्कम करण्याच्या हेतुने कांही पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये मुखेडचे युवा नेते मोहनावती पतसंस्थेचे माजी चेअरमन,व शिक्षक सेना तालुका अध्यक्ष *सचिन रामदिनवार* यांची जिल्हा सहसचिवपदी,तसेच शिक्षक सेनेची तोफ म्हणुन प्रसिद्ध असलेले *आकाश राजुरे* यांची जिल्हा संघटक पदी,व उपक्रमशिल शिक्षक तसेच मोहनावती शिक्षक पतपेढी विद्यमान सचिव *राम कोंडीबा जाधव* होनवडजकर यांची शिक्षकसेना मुखेडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषजी अंबुलगेकर, सचिव रवि बंडेवार, मार्गदर्शक संजय कोटगीरे,संघटक अरुण भारदे,कार्याध्यक्ष मनोहर भंडेवार,मराठवाडा सहसचिव विठ्ठल देशटवाड,कोषाध्यक्ष गंगाधर कदम , यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीमुळे शिक्षक सेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.त्यांच्या निवडीबद्दल विस्तार अधिकारी श्री व्यंकटराव माकणे,श्रीशिवशंकर जंपलवाड केंद्रीय मु.अ.मनोहरराव जाधव,शिक्षक नेते शिवाजीराव इंगोले,आदर्श शिक्षक नामदेवराव सुर्यवंशी माधव माधसवाड,शरद डावकरे,बळवंत डावकरे,गजानन पवितवार,गंगाधर वडगावे,कार्याध्यक्ष पद्माकर जवळदापके,सचिव रविकुमार कामन्ना,कोषाध्यक्ष मारोती लंगोटे,संघटक माधव उलीगडे,संदीपकुमार पेंडलवार,हणमंतराव इंगळे,मोरेसर,हाळेसर,डी.व्ही.बिरादार,केंद्रेसर,भरत जाधव,स्वामी एन.बी.,अंदुरे सर,संतोष जांबकर,ज्ञानेश्वर शिंदे,शिवाजी सोमुसे,औरादकर सर,माधवराव हिवराळे,पडवळकरसर,कलबुर्गेसर, यासह अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS