प्रतिनिधी/माजलगांव
ओबीसी समाजात एकुन ४०० जमातींचा समावेश आहे ओबीसी समाजात ऐवड्या जमाती असुन ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गधा येत आहे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण हे भारतीय संविधाना मागास प्रवर्ग, दुर्बल घटक, उपेक्षित घटक म्हणून भारतीय संविधानाने व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला शिक्षण व नोकरी करण्यासाठी दिलेले आहे ओबीसी समाज सर्वच घटकात मागास अाहे या घटकाला शिक्षण व नोकरी यामध्ये जीवन सुधारण्यासाठी व समाजाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी ओबीसी बांधवांना २७ टक्के आरक्षण दिले आहे परंतु ओबीसी समाजात एकुन ४०० जमाती असुन त्यांच्या वाट्याला ऐणारे २७ टक्के आरक्षण तुटपुंजे आहे दिवसेंदिवस ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गधा येत आहे ओबीसी समाजासह, व्हीजेएन्टी, एसबीसी , जमातीचे आरक्षणावर गधा येत आहे.
मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे, मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या व नोकरीच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे जेणेकरून मराठा समाजातील ही तळागाळातील होतकरू , गुणवत्ता विद्यार्थ्यांना नोकरी करण्यासाठी संधी मिळेल, ओबीसी समाजात अधिच एकुन ४०० जमाती असुन ते आरक्षण पुरते नाही ओबीसी समाजाला वाढीव आरक्षण द्यावे व ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृती बंद आहे ति चालु करावी ओबीसी समाज येत्या ८ डिसेंबर रोजी सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव व ओबीसींच्या इतरही मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चास सर्व ओबीसी संघटना सह सर्व समाज बांवानी आपल्या न्याय, हक्कासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चास उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तसेच ओबीसी संघटन जिल्हाअध्यक्ष राम कटारे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS