नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
मूकबधिर दलित समाजातील 30 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नायगांव येथील विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिली.
बिलोली येथील सदर घटनेचा सर्वत्र निषेध होत असून मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी समाज व विविध संघटनेचे कार्यकर्ते एकवटले आहेत. ही वार्ता ऐकल्यानंतर कोणाचेही मन हेलावणारच अशी निर्दयी कृत्य करून आरोपी मोकाट असल्याने त्यांना त्वरीत अटक करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नायगांव येथील नगरपंचायतचे नगराध्यक्ष शरद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली नायगांव तहसीलदार यांना प्रथम नगराध्यक्षा चे प्रतिनिधी पंढरी भालेराव, फकीरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भालेराव, रिपाई चे जिल्हाध्यक्ष राजकुमार सोनकांबळे, गुरु रविदास समता परिषदेचे प्रकाश कांबळजकर, आझाद समाज पार्टीचे कपिल डुमने, शंकर गायकवाड, बंटी नायगावकर, आर डी वाघमारे,कपील गायकवाड, पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले आहे.

COMMENTS