नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) दरवर्षी प्रमाणे चंपाषष्ठी ला होणारी घुंगराळा ता.नायगांव येथील खंडोबा देवाच्या यात्रेतील दिं.21/12/2020 रोजी होणारे जंगी कुस्त्यांचे सामने,व दिं.21/12/2020 रोजी होणारे कृषी प्रदर्शन व पशूप्रदर्शन,सांगित महोत्सव हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती यात्रा समिती,ग्रामपंचायत कार्यालय ,खंडोबा मंदिर देवसस्थान ट्रस्ट यांनी दिली आहे.
तसेच दिं.20/12/2020रोजी कुंटूर येथून येणारी देवाची पालखी येणार आहे.देवाच्या सर्व पुजा,पालखी सोहळा ,आंबील जेवण धार्मिक पध्दतीने व साधेपणाने व कोरोनामुळे कमी लोकात,व सुरक्षित अंतर ठेवूनच होतील.
तरी गावकरी,भाविक भक्त यांनी ही यात्रा साधेपणाने व कोरोणाच्या नियमाच्या अधिन राहून करावी असे आवाहान सरपंच सौ.शकुंतलाबाई मातावाड,उपसरपंच वसंत सुगावे पाटील,ग्रामविकास अधिकारी राजेश दमकोंडवार,व यात्रा समिती ,खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट यांनी केले आहे.

COMMENTS