*केज तहसील समोर शेकाप ,रिपब्लिकन सेना, संभाजी ब्रिगेड ,संघर्ष समिती, मानवहीत पक्षचे निदर्शने*
केज (प्रतिनिधी)
दिल्लीमध्ये गेली सात दिवसा पासून शेतकरी, कृषी विधेयक रद्द करा या मागणीसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र आपल्या सरकारने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्या ऐवजी पोलिसांच्या माध्यमातून पाणी, अश्रुधूर ,लाठीचार्ज ,
करून शेतकऱ्यावर हाल्ला करण्यात आला, त्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन सेना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना,मानव हित लोकशाही पक्ष,केज संघर्ष समीती, च्या वतीने केज तहसीलसमोर जाहीर निषेध करुन चालू असलेल्या आंदोलनाला केज मधुन पाठिंबा दिला.
सदरील कृषी विधेयके हे शेतकऱ्याच्या बाजूचे नाहीत शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत ते तिन्ही वेधयके शेतकऱ्यांच्या मूळ व्यवस्थेवर घाव घालणारे आहेत, या नव्या विधायका मुळे शेतकऱ्यांचे कुठलं ही हीत साधता येणार नाही हे विधेयक तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी दिनांक 4 डिसेंबर रोजी केज तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली, निवेदनात केंद्रातील नव्याने पारित केलेले कृषी विधेयके रद्द करा,
शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाचा विद्युत पुरवठा द्या,
कृषी पंपाचे वीज बिल माफ करा,एसबीआय शाखा केज, आणि हैदराबाद बॅक शाखा केज या बँकेकडील पेंडिंग पिक कर्ज तात्काळ मंजूर करा आशा विविध मागण्या यावेळी केल्या,
दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज केज तहसील समोर दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले,
या आंदोलनाला रिपब्लिकन सेना ,संभाजी ब्रिगेड ,मानवत हित पक्ष, संघर्ष समिती, च्या वतीने पाठिंबा दिला या वेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा बाजी केली तात्काळ विधेयक रद्द करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे ,
या प्रसंगी प्रा हनुमंत भोसले, जीडी देशमुख ,मंगेश देशमुख, महेश गायकवाड ,रज्जाक सायद, गोपीनाथ इनकर, अविनाश काळे ,योगेश आमदार, अनिल गालफाडे ,अक्षय वैरागे, मोहिनीताई भांगे ,राणीताई बावणे ,अभय जाधव ,विशाल मुळे ,हनुमंत मोरे, राज तपसे, दीपक कदम ,प्रकाश सोनवणे, सुनील मुळे , यांनी केज तहसील कार्यालया मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले

COMMENTS