आज दि. ४ डिसेंबर २०२०. मुंबई च्या इतिहासात एक दंतकथा बनून राहिलेले मुंबई कस्टम्स चे दिवंगत जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांची ४२ वी पुण्यतिथी.
भारतीय सीमा शुल्क विभागाच्या इतिहासात प्रथम राष्ट्रपती पुरस्कार (१९६४) मिळविण्याचा मान जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांनी मिळविला तसेच हाच पुरस्कार परत दुसऱ्यांदा (मरणोत्तर , १९७९) प्राप्त करून ,प्रथमच दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळविण्याचा विक्रम देखील त्यांचाच नावावर नोंदला गेलाय हे विशेष.
आज मुंबई कस्टम्स च्या बॅलार्ड पिअर येथील मुख्यालयात सकाळी ११ वाजता ,आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात, मुख्य कस्टम्स आयुक्त,झोन १, श्री . एस. आर. बरूआ व मुख्य कस्टम्स आयुक्त ( सामान्य) ,श्रीमती प्राची सरूप ह्यांनी दिवंगत जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांच्या स्मृतींना ,पुष्पांजली द्वारे अभिवादन करून ,भारतीय कस्टम्स च्या ह्या महानायकाला आदरांजली वाहिली. त्यानंतर मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी गण व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तसेच ह्या समारंभाचे विशेष आयोजन करणाऱ्या " मुंबई कस्टम्स ग्रुप सी ऑफिसर्स युनियन "च्या उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व इतर युनियनच्या अनेक मान्यवर नेत्यांनी ह्या महानायकाला वंदन करून ,त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. याप्रसंगी ऑल इंडिया कस्टम्स ग्रुप सी ऑफिसर्स फेडरेशनचे अध्यक्ष संतोष पेडणेकर तसेच युनियन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मारुती विश्वासराव

COMMENTS