📕सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली होती मागणी
📕 शेतकऱ्यांना दिलासा
प्रतिनिधी
कापसाच्या गाडीचे वजन झाल्यानंतर कापूस खाली करण्याच्या नावाखाली जिनीग मालकाकडून घेण्यात येणाऱ्या बेकायदा हमालीस सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या (18 डिसेंबर) लेखी तक्रारी नंतर असे आदेश जिल्हा निबंधकांनी सर्व मार्केट कमिटीस दिले .
चालू हंगामात परभणी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेल्या दिवसापासून कापसाच्या गाडीचे वजन झाल्यानंतर ती गाडी खाली करण्याच्या नावाखाली जिनिंग चालक मालकाकडून हमाली पोटी 15 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे पैसे घेण्यात येत होते. त्याचबरोबर गाडीचे वजन करण्यासाठी प्रति गाडी 100 रुपये घेण्यात येत आहेत. अशी लेखी तक्रार धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी जिल्हा निबंध सुरवसे यांच्याकडे 18 डिसेंबर शुक्रवारी केली होती. निवेदन देते वेळी जिल्हा निबंधक सुरवसे आणि सखाराम बोबडे यांच्या झालेल्या चर्चेत कापूस खरेदी केंद्रावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटी व गैरसोय बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यासंदर्भात सुरवसे यांनी तात्काळ आदेश काढून सोमवारपासून कापसाचे वजन झाल्यानंतर गाडी खाली करण्यासाठी च्या नावाखाली घेण्यात येणारी हमाली बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर यासंदर्भात तसे फलकही लावले जाणार आहेत. यावरूनही जिल्ह्यातील एकदा शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील जिनिंग चालक-मालक शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करत असल्यास संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.*
शेतकऱ्यांची लूट थांबू शकलो याचा आनंदच-बोबडे*
वजन झालेली कापसाची गाडी खाली करणे साठी हमालीच्या नावाखाली होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबू शकलो याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया निवेदन करते धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केली. सोमवारपासून कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असला तरी आजपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस विकला त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेले पैसे शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS