नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
दिनांक 16 डिसेंबर 2020 रोज बुधवार शब्द शब्दगंध शब्दसमूह प्रकाशन औरंगाबाद यांच्या वतीने *माझी शाळा माझा उपक्रम* या योजनेअंतर्गत दिगंबर हनमंतराव मुदखेडे सुजलेगावकर तालुका नायगांव जिल्हा नांदेड यांना महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मौलाना आजाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे तारीख 16 डिसेंबर 2020 रोजी बुधवार यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला आहे या प्रसंगी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित द ब्राईट स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल उमदरी तालुका मुखेड चे प्राचार्य माननीय कैलास मुंडकर सर उपस्थिती सदरील कार्यक्रमात शाळा व नवोदितांच्या कवीने कविता सादर करण्यात आल्या त्यामध्ये दिगंबर मुदखेडे यांनी *गुरुजी तुम्ही शिकवा धडा* कवितेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यामध्ये काय दुवा असतो त्यांनी स्वलिखित लेखन करून वाचन करण्यात आले आहे या सोहळ्याला विविध क्षेत्रातील कलावंत व कवी लेखक साहित्यिक वृत्तपत्राचे संपादक उपस्थित होते प्रत्येक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला मुदखेडे सर यांचा विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS