बीड/ प्रतिनिधी
विश्व-कल्याण कार्यालयात आज सकाळी दहा वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करताना विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्थांच्या संस्थापक अधक्ष
किसकींदा पांचाळ, महापरि निर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.०६ डिसेंबर १९५६ रोजी ज्ञानाचा अथांग सागर, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांचा प्राण तळमळला, एवढेच नव्हे तर दादरच्या त्या सागराचा देखील प्राण तळमळला असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, आमच्या पुढील अनेक पिढ्यांना ही शिकवण प्रेरणा देणारा असेल असे महिला सेवाभावी संस्थेच्याअध्यक्ष किस्किंदा पांचाळ म्हणाल्या विश्व-कल्याण महिला सेवाभावी कार्यालयात महापरी निर्वाणदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित संस्थापक अध्यक्ष किसकींदा पांचाळ, शोभा वीर, अँड. प्रियंका सूर्यवंशी, बालाजी जगतकर, आत्माराम व्हावळकर,
राजाभाऊ व्हाळकर, सय्यद आलिम, दुर्गा गायकवाड, बालकिशन सोनी,भागवत वैध,
वशिष्ठ साबळे, दत्तात्रेय सौंदर्यमल, शिवप्रसाद शिरसाट,
भास्कर जावळे,आदी उपस्थित होते.

COMMENTS