केज / प्रतिनिधी
केज तालुका संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक शनिवारी सकाळी 11 वाजता येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यामध्ये तालुका कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव म्हणून रामराजे गलांडे यांची निवड करण्यात आली. सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठा सेवा संघ समन्वयक कक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व गोविंद नाना शिनगारे, विलास गुंठाळ,राहुल खोडसे, ऋषिकेश गलांडे, किशोर भालेराव, दत्ता मुजमुले योगेश अंबाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेडची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यामध्ये आगामी काळात पक्षाची विचारधारा समाजात पोहोचविण्याच्या दृष्टीने पक्षाची कार्यकारिणी मजबूत करण्यासाठी काही निवडी करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने तालुका सचिव म्हणून रामराजे गलांडे तर तालुका उपाध्यक्ष गजानन अंबाड, तालुका कार्याध्यक्ष अमर नखाते, तालुका संघटक अमरजीत धपाटे, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून संदीप शितोळे व चिंचोली माळी सर्कल प्रमुख म्हणून राम राऊत व विद्यार्थी आघाडीचे कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक भिसे यांची निवड करण्यात आली. या निवडी बद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शेखर थोरात, गजानन गायकवाड, अभिजीत शितोळे, नरसिंग यादव, शुभम काळे ऋषिकेश डोरले, ऋषिकेश काळे, रोहित गालफाडे, आसिफ पठाण, मुगाजी देशमुख, वैभव कुपकर, श्रीपाद डोके, आकाश भिसे, लखन रोडे, विशाल अंकुशे यांच्यासह बहुसंख्य युवक उपस्थित होते. चौकट :- येत्या महिन्यात काम पाहून चाचपणी करुन तालुका अध्यक्षाची निवड केली जाईल. जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे.

COMMENTS