माजलगाव/प्रतिनिधी अभिनेता संदिप पाठक यांना माजलगाव भुषण तर जेष्ठ पत्रकार संतोष मुळी यांना दर्पण पुरस्कार जाहिर करण्यात आला असुन 6 जाने...
माजलगाव/प्रतिनिधी
अभिनेता संदिप पाठक यांना माजलगाव भुषण तर जेष्ठ पत्रकार संतोष मुळी यांना दर्पण पुरस्कार जाहिर करण्यात आला असुन 6 जानेवारीला दर्पण दिनी पुरस्काराचे वितरण होणार आहे.
माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी दर्पण दिनानिमीत्त कोरोना कालावधीमध्ये महत्वाची भुमिका बजावणा-या कोरोना योध्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नारी शक्तीचाही सन्मान करण्यात येणार आहे. वैष्णवी मंगल कार्यालयात दि. 6 जानेवारीला या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजलगावच्या मातीतील असलेला सिनेअभिनेता संदिप पाठक तर सकाळचे बातमीदार संतोष मुळी यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या बैठकीस पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर, तुकाराम येवले, कमलेश जाब्रस, दिनकर शिंदे, महेंद्र मस्के, दत्ता येवले, अरविंद ओव्हाळ उपस्थित होते.

COMMENTS