राम दातीर माहूर (प्रतिनिधी )नाभिक समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,व्यसनाधिनता दूर करण्यासाठी तसेच समाजाचा विकास,त्यांच्यावर होणारे अन्याय,...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )नाभिक समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,व्यसनाधिनता दूर करण्यासाठी तसेच समाजाचा विकास,त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचाराला लोकशाही मार्गाने वाचा फोडण्यासाठी माहूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खुशाल झामरे यांची नाभिक सेवा संघाच्या माहूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
प्रवीण झामरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष माधव भाले यांचे आदेशावरून जिल्हाध्यक्ष वैभव राऊत यांनी त्यांची नाभिक सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करून स्थानिक हॉटेल देवी प्राईड मध्ये समाज बांधवांचे उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.अनेक मान्यवरांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS