केज(प्रतिनिधी). केज तालुक्यातील मौजे आवसगावं येथे मागील ६० वर्षांपासून आद्याप आवसगाव हुन तालुक्याला जाण्यासाठी बस व्यवस्था झाली नसल्यामुळे केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा यांनी विभागीय नियंत्रक,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बीड व आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धारूर यांना केज-आवसगाव बस सेवा सुरू करण्या साठी पत्र पाठवले आहे,
सदरील पत्रा मध्ये केज तालुक्यातील आवसगावं येथील विद्यार्थी , शेतकरी ,कष्टकरी यांच्या दैनंदिन विविध शासकीय , शैक्षणिक,कार्यालयीन कामा निमित्त तालुक्या च्या ठिकाणी यावे लागते त्यामुळे ये जा करावी लागत असुन ग्रामीण भागातील ७०% नागरिकांनाकडे वहानांची वैयक्तिक सुविधा नसल्याने वेळेवर कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहाता येते नाही तसेच आरोग्यासाठी दवाखान्यात वेळेवर पोचता येतं नसल्याने कितेक वयोवृद्ध नागरीकांची गैरसोय होत असुन तसेच सदरील मार्गावर जवळपास 100 विद्यार्थी शिक्षणासाठी केज येथे जातात व येतात यांची समस्या दुर झाली पाहिजे यासाठी बस सेवा सुरू करण्या साठी युवा संघर्ष समिती यांनी यापूर्वी निवेदन दिलेले आहे.
सदरील केज -आवसगावं मार्गावर सकाळी 8.30 ते 9.00च्या दरम्यान व संध्याकाळी 5ते6 च्या दरम्यान दुसरी फेरी सुरू करुन ग्रामस्थांची गैरसोय टाळावी असे आमदार नमिता मुंदडा यांनी व युवा संघर्ष समिती शाखा आवसगावंच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे सदरील निवेदनावर मौजे आवसगावं येथील युवा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळपास 50 स्वाक्षरी आहेत सदरील निवेदनाची दखल घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल असे सकारात्मक निवेदन स्विकारताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी यांनी माहिती दिली .

COMMENTS