माजलगाव/प्रतिनिधी
शहरात आंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची झालेल्या विंटबना प्रकरणी निषेध व समाजकंटकांना आटक करण्याच्या मागणीसाठी पि.आर.पी.च्या वतिने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते,मात्र पोलिसांनी रस्ता रोको आंदोलन होण्या आगोदरच पि.आर.पी.चे तालुकाध्यक्ष राकेश साळवे व विधानसभाध्याक्ष सिध्दार्थ ससाने यांना आटक करण्यात आली.
देशात दलीतांवर होणारे वाढते आत्याचार व आंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विंटबना केल्याच्या निषेधार्थ व समाजकंटकांना आटक करण्याच्या मागणीसाठी पि.आर.पी.(कवाडे गट ) च्या वतिने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते,मात्र रस्ता रोको आंदोलन करण्या आगोदरच आंदोलनकर्त्यांना माजलगाव शहर पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम ६८/६९ प्रमाणे आटक केली असुन यामध्ये पि.आर.पी.चे तालुकाध्यक्ष राकेश साळवे व विधानसभा अध्यक्ष सिध्दार्थ ससाने यांचा समावेश असुन पोलिसांनी आंदोलनकर्त्या त्यांच्या आंदोलना पासुन परावृत्त होत नाहीत,तोपर्यंत त्यांची सुटका करण्यात येणार नसल्याची माहिती माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधंवत यांनी बोलतांना सांगितले.
COMMENTS