उदगीर -पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषद व मराठा सेवा संघ उदगीरच्या वतीने रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे 10 वी व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यमंत्री मा. ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, पद्मश्री वि.वि. पा.कृषी परिषदेचे प्रदेशसचिव प्रा. विवेक सुकने यांनी प्रास्ताविक मांडले. परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जात असलेल्या उपक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढगे यांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता लवकर करण्याची मागणी करुन मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हायला हवा असे मत मांडले. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना. संजयभाऊ बनसोडे (राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी आयोजकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वसतिगृहाचा व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मतदारसंघात होत असलेल्या कामाची माहीती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामेश्वर गोरे , शिक्षण विस्तार अधिकारी नितीन लोहकरे , संभाजी ब्रिगेडचे विभागीय नेते राजकुमार अतनुरे , शिवाजी पाटील तोंडचिरकर , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल काकडे , जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष किशनराव बिरादार , मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक माधव हलगरे, अनिताताई जाधव , रामेश्वर बिरादार , संतोष बिरादार , बाबुराव आंबेगावे, पुषपा ताई जाधव, अनीता जगताप, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. संभाजी जाधव व भरत पुंड यांनी केले. बबीता पाटील यांनी जिजाऊ वंदना घेतली तर प्रतिभाताई मुळे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष विजयकुमार चवळे ( माजी नगरसेवक, उदगीर ) , उत्तम मोरे , अंगद पाटील नागलगावकर, भास्कर मोरे , संदीप जाधव, कालीदास बिरादार, कमलाकर मुळे , सतीश पाटील माणकीकर आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS