नायगांव प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.महेबुब भाई शेख हे मराठवाडा पदवीधर विधानसभा मतदार संघाचे महविकास आघाडीचे उमेदवार *मा.श्री सतीश जी चव्हाण साहेब* यांच्या प्रचारार्थ नांदेड कडे मार्गक्रमण करत असताना त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे *प्रदेश सरचिटणीस श्री वसंत सुगावे पाटील* यांच्या वतीने *घुंगराळा* येथे सत्कार करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नायगांव, धर्माबाद, उमरी, मुखेड, देगलुर, बिलोली येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम,धर्माबाद तालुकाध्यक्ष हणमंत पा.जगदंबे,जिल्हा संघटक पंडीत पा.जाधव,बिलोली तालुकाध्यक्ष रंजीत पा.हिवराळे,मुखेड तालुकाध्यक्ष संभाजी पा.मुकनर,देगलूर तालुकाध्यक्ष चंद्रकांत मोरे,शहराध्यक्ष सुमीत कांबळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस नायगांव चे विलास पा.धुप्पेकर,देगलूर चे शिवकुमार पा.डाकोरे ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नायगांव तालुकध्यक्ष व्यंकट पा.शिंदे, अमोल पा.सातेगावकर,देगलूर तालुका सोशल मिडिया तालुकाध्यक्ष सय्यद खलील ,माजी उपसरपंच शिवाजी पा.ढगे,चेअरमन नारायण पा.ढगे,राजेश ढगे,माधवराव पा.ढगे,माधव जलदेवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

COMMENTS