मुंबई दि.२१: कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र यांनी केंद्र सरकारच्या कामगार हितविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी औद्योगिक आंदोलनाची हाक दिली आहे, त्याला राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष माजी राज्य मंत्री सचिनभाऊ अहिर यांनी सशर्त पाठिंबा दिला आहे.
परेलच्या मझदूर मंझील मध्ये संघटनेचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन,अध्यक्षांनी दशव्यापी औद्योगिक आंदोलनाला पांठिबा व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वा खालील सबंध महाराष्ट्रामधील कारखाना व आस्थापनातील कामगार एकत्रित सकाळी उद्योग सुरू होण्यापूर्वी,मधल्या सुट्टीत किवा संध्याकाळी सुटल्यावर कंपनीच्या गेटवर अर्धातास निदर्शन आंदोलन करुन केद्रसरकाच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध करतील.
गिरणगावात भारतमाता, लालबाग येथे २६ रोजी सकाळी ११ वाजता जनसंघर्ष आंदोलन आंदोलन आयोजित करण्यात य ऊन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला जाईल, असे राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे.
सर्वश्री निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,लक्ष्मण तुपे,लक्ष्मण तुपे,शिवाजी काळे यांनी वरील बैठकीत बोलताना सांगितले,मुंबईतील गिरणी कामगारासह , अनेक उद्योग धंद्यातील कामगार या आंदोलनात सहभागी होतील.केंद्र सरकारने कामगार कायद्यातील बदलातून मालक धार्जिणेधोरण स्वीकारून कामगारांना देशोधडीला लावले आहे. कामगारांना हालाखीत लोटणारे धोरण केंद्र सरकारने मागे घ्यावे,अशी मागणी या देशव्यापी आंल़ोलनातून करण्यात येणार आहे.★★

COMMENTS