नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
नायगांव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील किशनराव जुने या तरुणाने पाच एकर शेती मध्ये लागणाऱ्या खतासाठी गांडूळ खताची निर्मिती करण्यास सुरुवात करून सदरील पाच एकर जमिनीमधील दोन एकरमध्ये सीताफळ ,दोन एकर मोसंबी ,एक एकरमध्ये जांब्याची लागवड केली आहे, त्या फळबागेमध्ये सोयाबीन , हरभरा , तूर हे आंतरपीक म्हणून घेत आहेत या पिकापासून सोयाबीन पासून तीन लाखाचे उत्पन्न मिळविले असून सध्या शेतात असलेल्या हरभरा ,तूर , गहू ,या पिकापासून आठ ते दहा लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचे किशनराव जुने या तरुणाने बोलून दाखविले आहे. शेतीला रासायनिक खत न वापरताही गांडूळ खताने योग्य उत्पन्न काढता येते हे जुने या तरुणाने सिद्ध करून दाखविले आहे.
किशनराव जुने या तरुणाने रासायनिक खताला बगल देत त्यांनी रासायनिक खाताची एक ब्यागही खरेदी केलेली नसून त्यांनी स्वतःच गांडूळ खताचे पाच बेड तयार करून पंधरा एकर एवढ्या शेताला पुरेल असा गांडूळ खत, तयार करून शेंद्रीय खताचा व शेंद्रीय औषधीचा जांब, सीताफळ,मोसंबी,तूर , गहू आदी पिकासाठी वापर करून लाखोंचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे,
जुने या तरुणाने मोसंबी , सीताफळ व जांबाची गेल्या चार वर्षाखाली लागवड केली असून या फळझाडांना शेंद्रीय गांडूळ खताचा वापर केले असल्याने आज या बागेमध्ये मोसंबी , सीताफळ व जांबाची झाडे फळाणी बहरली आहेत तर या खतापासून तयार करण्यात आलेल्या फळबागेतील फळ मानवाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात असेही जुने यांनी बोलून दाखविले.


COMMENTS