नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
भारतीय हिंदु धर्मातील महत्त्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते तसे तर श्रीमंत वर्गाची रोजच दिवाळी असते पण उपेक्षित माणसं दिवाळी आली की त्यांच्या उरात धडकी भरते कारण आपल्या माथी दारिद्र्य असल्याने दिवाळी कशी साजरी करावी या मध्ये बैचन असताना एका गावातील दोन गरीब कुटुंबांना प्रत्येकी विस विस हजाराची मदत देऊन डॉ. मधुसूदन दिग्रसकर यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आहे.
वर्षानुवर्षे चालत आलेली गरीबी श्रीमंतीची दरी, त्यातल्या त्यात कोरोणामुळे लांकडावून व सरकारचे कष्टकरी वर्गाबाबत उदासीनता यामुळे गरिबाने जगावे कसे व मरावे कसे हाच प्रश्न सातत्याने त्यांना भेडसावत असताना दिवाळी ही त्यात फटाक्यांची आतिषबाजी करीत आली, आपल्या पोराबाळांना कपडे, गोडधोड खाणे, बाईलेकीला कसे आणावे आणि ओवाळणी कुठली टाकावी या मन चिंतातुर असलेल्या दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या दोन कुटुंबातील व्यक्तींना शहरातील लाईफ लाईन दवाखान्याचे सुप्रसिद्ध डॉ. मधुसूदन दिग्रसकर यांनी दत्ता कदम व रामा कुंटूरकर या दोन व्यक्तींना प्रत्येकी वीस विस हजाराची घरी जाऊन मदत केली असल्याने त्यांचा दिपावली हा सण आनंदात पार पडला आहे, पण दुःखितांचे अश्रू पुसण्यात डॉ. दिग्रसकरां सारखे समाजात फारच थोडे आहेत म्हणून त्यांचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे. मीडियावर ही पोस्ट पाहताच डॉ. दिग्रसकर यांना भ्रमणध्वनीद्वारे बोलले असता ते म्हणाले की, गोरगरीब लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे म्हणजे हीच माझी खरी दिवाळी समजतो असे म्हणून त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आहे. सदर गरीब कुटुंब हे नायगांव तालुक्यातील मांजरम व कुंटूर येथील असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काजलपुर तालुका बांसिवाडा येथे स्थायिक झाले होते, तेव्हा डॉ. दिग्रसकर यांनी तिथे जाऊन ही चाळीस हजाराची मदत त्या गरजुना करून एक आदर्श निर्माण केला आहे.

COMMENTS