जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे नांगरणीचे काम करत असताना शेतातील विहिरीत ट्रॅक्टर सह पडल्यामुळे सचिन मिरासे या तरुणाचा मृत्यू झाला होता.सचिन मिरासे हे कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील रहिवासी असून दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली होती, सचिनचा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागहोता. सचिन ट्रॅक्टरने शेतात नांगरणीचे काम करत असतांना ही घटना घडली होती, या घटनेमुळे सचिन मिरासे गेल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांनी मराठा आंदोलनात सहभाग नोंदवला होता. ते मराठा शिवसैनिक सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून संघटनेचे काम करीत. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात असताना आज दि.30 नोव्हेंबर 2020 रोजी कसबे धावंडा येथे मराठा शिवसैनिक सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष स्वर्गवासी सचिन मिरासे पाटील ह्यांच्या कुटूंबियांना द ग्रेट मराठा व्हाट्सएप ग्रुपचे अडमिन गजानन निर्मले व सर्व सदस्यांकडून 32 हजार दोनशे रुपयाचा धनादेश सचिन मिरासे यांच्या बंधुकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील, ऍड.वैभव शिंदे पाटील,शुभम राजे, शेख सादेख, सोनू डांगे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

COMMENTS