नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. श्री शिरीषजी बोराळकर यांच्या प्रचारार्थ दि. 25 रोजी मुखेड येथील सर्व संस्थापक अध्यक्ष, सचिव,प्राचार्य,प्राध्यापक व बूथ प्रमुख, पालक व इतर पदाधिकाऱ्यांची मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषार गोविंदराव राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुखेड येथे महत्वपूर्ण पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत आपला विजय होणारच आहे पण त्यात मुखेड येथील पदवीधर निवडणुकीचा प्रभाव सर्वात मोठा नक्कीच होणार असल्याचे आमदार डॉ. तुषार राठोड साहेब बोलताना सांगितले यावेळी जिल्हा सरचिटणीस माधव पाटील उच्चेकर,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगिरे, व्यंकटराव पाटील चांडोळकर,नारायण गायकवाड, माधव अण्णा साठे, शेखर देशमख,प्राचार्य हरिदास राठोड, प्राचार्य ताटे सर, डॉ. सतीश गरूडकर, डॉ बालाजी गरूडकर, मुखेड तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख व बूथ चे पालक,प्राध्यापक, शिक्षक,तसेच
भाजपा पदाधिकारी आदींची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

COMMENTS