*से.................
सेलू ( ) : येथील नावाजलेल्या स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात ५० वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. आजूबाजूच्या अवयवांना चिकटलेली जवळपास क्रिकेट मधील चेंडू एवढ्या मोठ्या आकाराची गर्भपिशवी योनीमार्गाद्वारे बिनाटाका काढून त्या महिलेची वेदनेतून मुक्तता करण्यात आली. स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. गणेश तोंडगे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील पोटदुखी व अंगावरून रक्तस्त्राव या सारख्या आजारामुळे त्रस्त असणारी ५० वर्षीय महिला तपासणीसाठी या विभागात आली होती. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र, ही शस्त्रक्रिया करणे अतिशय अवघड असल्याने खाजगी दवाखान्यात त्या महिलेवर उपचार करण्यास नकार देण्यात येत होता. त्यानंतर त्या महिलेने सरळ स्वा.रा.ती. रुग्णालय गाठले. सोनोग्राफी केल्यानंतर सदरील महिलेच्या गर्भपिशवीला गाठ व सूज असल्याचे निष्पन्न झाले. पूर्वीचे २ सीझर असून गर्भ पिशवी आजूबाजूच्या अवयवांना चिकटली होती. डॉ. गणेश तोंडगे आणि त्यांच्या टीममधील डॉ सुवर्णा काळे- नाईकनवरे, भूलतज्ञ डॉ. देवानंद पवार,यांनी अतिशय कौशल्याने ही शस्त्रक्रिया बिनाटाका पार पाडली. अतिशय गुंतागुंतीची असणारी ही शस्त्रक्रिया पोट उघडून न करता योनीमार्गाद्वारे बिनाटाका करून क्रिकेट मधील चेंडू एवढ्या मोठ्या आकाराची गर्भपिशवी काढून टाकण्यात आली.
या सर्व सुविधा लवकरच सेलू येथे अधिराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.सुवर्णा अशोक काळे (नाईकनवरे) यांच्या मार्फत सुरू होतील.
COMMENTS