महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश घायतिडक


माजलगाव (प्रतिनीधी) : तालुक्यातील उमरी गावचे सुपुत्र गणेश घायतिडक यांची नुकतीच महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची व वक्तृत्वाची दखल घेवून त्यांची पुढील एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवराज आनंदकर यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमुद केले आहे. ते जिजाऊ ज्ञान मंदिर उमरी बु चे अध्यक्ष असून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


टिप्पण्या