वसमत तालुक्यातील हापसापुर येथे गांज्याच्या शेतीवर हट्टा पोलिसांची कारवाई
21 लाख 87 हजारांचा गांज्या जप्त
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
मागील काहि महिन्यां पासुन हिंगोली जिल्ह्यात गांज्याची लागवड चोरी छुपे केल्याची माहिती समोर येत असुन पोलिसांनी वसमत तालुक्यात आत्तापर्यंत बर्याच ठिकाणी कारवाई करून गांज्या जप्त केला आहे. अशाच प्रकारे मंगळवारी हट्टा पोलिस ठाण्याचे हद्दीत हापसापुर येथे एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांज्याची लागवड केल्याची गुप्त माहिती हट्टा पोलिस ठाण्याचे कर्तबगार सहाय्यक पोलिस निरिक्षक गजानन मोरे यांना मिळताच सदरची माहिती मोरे यांनी पोलिस अधिक्षक कलासागर व सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांना दिली. ज्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गजानन मोरे, कुरूंदा ठाण्याचे सपोनी गोपीनवार यांच्या पथकाने हापसापुर येथील नामदेव सुर्यभान संवंडकर यांच्या शेतात छापा मारून शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गांजाची 345 झाडे ज्याचे वजन 273.400 किलो आसुन ज्याची किंमत 21 लाख 87 हजार 200 रूपये ईतकी आहे सदर गांज्या जप्त करून आरोपी शेतकरी याच्या विरूद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पोलिस निरिक्षक खंडेराव करीत आहेत.
COMMENTS