----------------------------------------------------
केज प्रतिनिधी:- केज तालुक्यातील साळेगाव येथे तिरूमला ऑईलचे प्रसिद्ध उद्योजक कुठे ग्रुपच्या वतीने अनाथांना फराळ वाटप करून दिवाळी गोड करण्यात जर आली.
या बाबतची माहिती अशी की, दरवर्षी साळेगाव येथे आदर्श पत्रकार संघाच्या वतीने गावातील गरीब, अंध-अपंग, परीत्यक्ता, विधवा व निराधार यांना दानशूर व्यक्तींच्या मदतीने दिवाळी निमित्त किराणा सामानाचे वाटप करून त्यांची दिवाळी साजरी करण्यास मदत केली जाते. परंतु या वर्षी अतिवृष्टी आणि कोरोना व लॉक डाउनच्या पार्श्वभूमीवर आव्हान करूनही मदत जमा होत नव्हती. ही माहिती उपसंपादक पत्रकार अविनाश वाघीरकर यांनी स्वतः आदर्श पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष पत्रकार गौतम बचुटे यांच्याशी संपर्क साधून खाद्य तेल उत्पादनातील अग्रेसर व प्रसिद्द तिरूमला ऑईलचे उद्योजक कुटे बंधू यांच्या मार्फत अनाथांना फराळाचे सामान वाटप करण्याची तयारी दर्शवली.
त्या निमित्त दिनांक १६ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी कुटे ग्रुपच्या वतीने साळेगाव येथील अनाथ व गरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. या वेळी उपसंपादक पत्रकार अविनाश वाघीरकर, कुटे ग्रुपचे संचालक मच्छिन्द्र आमटे, प्रमुख पाहुणे केज पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी साहेब, पत्रकार देवेंद्र सोनवणे, बाबासाहेब गित्ते, ज्ञानेश्वर इंगळे हे उपस्थित होते.
या प्रसंगी पत्रकार अविनाश वाघिरकर यांनी अनाथांच्या मदतीसाठी कुटे ग्रुप सदैव तत्पर असतो आणि त्यांची ही सामाजिक बांधिलकी असल्याचे विशद केले तर प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी पत्रकारांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ज्ञानेश्वर इंगळे यांनी गेल्या अनेक वर्षां पासून सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार पत्रकार गौतम बचुटे यांनी व्यक्त केले.
या वेळी पत्रकार जय जोगदंड, अक्षय वरपे, भारत बचुटे, बलभीम बचुटे, प्रवीण सरवदे, अमोल गायसमुद्रे, गजानन इंगळे, आंनद जोगदंड, अँड. उत्तरेश्वर बचुटे, हनुमंत ताकतोडे, अशोक बचुटेहे उपस्थित होते.
"आमच्या तोंडात दोन गोड घास घालणाऱ्याची भरभराट होवो."
--- श्रीमती सुरेखा सोनवणे
------------------------------------------------
" दोन दिवसांपासून आम्ही वाट पहात होतोत. आमच्या सारख्याना अन्न देणारेच खरे देव आहेत."
--- विठोबा वैरागे
COMMENTS