*अनंत जाधव /मस्साजोग*
*केज तालुक्यातील केळगाव/बेलगाव ग्रामपंचायत मधील शासकीय योजनेतील 2010 पासून ची सर्व विहिरी, घरकुले शेततलाव ,रस्ते अशी बरीचशी कामं शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदोपत्रीच कामे करून बीलं उचलुन घेण्यात* *आलेले आहेत, वरील कामातील एकही विहीर खोदली नाही ना घरकुल चे घर बांधले ना शेत तलाव आणि रस्त्याची कामे तर एकच रस्त्याला दोन/तीन वेगवेगळी नावे देऊन कागदावरतीच कामे करून घेतली आहेत असे अनेक रस्ते आहेत,बोगस लेबर चे जॉब कार्ड तयार करून त्यांची पोस्टामध्ये खाती खोलून खोट्या सह्या करून पैसे उचलले गेले आहेत ,काही अशा लोकांचे जाॅब कार्ड बनवले जेकी नोकर्या करत आहेत, चांगले उद्योग धंदे करत आहेत चांगली आणि भरपूर शेती आहेत अशा लोकांची लेबर म्हणून नावे लावली आहेत आणि असे बरेच शेतकरी/ नागरिक तर असे आहेत की त्यांना माहितही नाही की त्यांच्या नावावरती, वीहीर ,शेततलाव घरकुल आहेत म्हणून आणि ते कधी मंजूर झालं आणि कधी त्याचे पैसे उचलूनही घेतले, जर कोणी या बोगस कामावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर बोगस कामे करून कमवलेल्या पैशाच्या जोरावर सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबला जातोय , केळगाव/ बेलगाव मधील बऱ्याच युवकांनी ऑनलाइन माहिती अधिकाराचे अर्ज दिलेले आहेत परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती शासकीय अधिकाऱ्याकडून मिळालेली नाही अधिकाऱ्यांचा फॉलोअप घेतला तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात आज पर्यंत कोणत्याही कामाची जाग्यावरती येऊन पाहणी/ तपासणी केलेली नाही याचा अर्थ या कामामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, समाजसेवक प्रताप दातार यांनी 2010 ते 2020 या कार्यकाळातील कामांचा ऑनलाइन माहिती अधिकाराचा अर्ज भरून आरोप केला आहे

COMMENTS