जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
अगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक कार्यालयात शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगोली चे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक आयपिएस राकेश कलासागर यांनी अगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजीत अगामी दुर्गामहोत्सव, दसरा महोत्सव, धम्मचक्र परिवर्तन दिन बैठकित पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, खाकीबाबा मठाचे महंत कमलदास महाराज, मोलवी, धर्मगुरू यांची उपस्थिती होती. यावेळी कालासागर यांनी बोलतांना सांगितले कि, सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टंशींग, सोबत मास्क सँनिटायजर चा उपयोग करावा तसेच जिल्हाधिकारी व प्रशानाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल. सोशल मिडियावर पोलिसांची नजर असुन आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यावर कडक कारवाई करण्यात येईल
COMMENTS