अविनाश सुत्रावे यांच्या वल्ड'स फर्स्ट ग्राफीक्स हिस्ट्री आँफ इलेक्ट्रॉनिक्स पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला.*

*बातमी*


*


 


 


सेलू ( )दि. १४( बुधवार) रोजी वल्ड'स फर्स्ट ग्राफीक्स हिस्ट्री आँफ इलेक्ट्रॉनिक्स ह्या पुस्तकाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उध्दव व्ही. भोसले ह्यांच्या हस्ते कुलगुरूंच्या दालनात पारपडले. तंत्रज्ञान जरी पुढे गेले असले तरी आज-काल च्या विद्यार्थ्यांना अश्या प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ उध्दव व्ही. भोसले यांनी या प्रसंगी केले. हे पुस्तक इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या इतिहासावर लिहिलेली आहे. सदर पुस्तक फोटो,वर्णनात्मक चित्र आणि मचकूर यांचा वेगळ्या व सुरेख पद्धतीने उपयोग करून लिहिलेले आहे. पुस्तकाच्या नावाप्रमाणे लेखकानुसार आजतागायत अश्या पध्दतीने इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या इतिहासावर कोणतेही पुस्तक प्रकाशित झालेले नाही. सदर पुस्तक लिहिताना आंतरराष्ट्रीय माणकांचा वापर केला असून पुस्तक आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखन करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. वाचकांना एक नवीन पद्धतीचे पुस्तक वाचण्याचा अनुभव येईल, असे पुस्तकाचे लेखक अविनाश सूत्रावे यांनी सांगितले आहे. काही दिवसात सदर पुस्तक ऑनलाईन उपलब्ध होईल आणि वाचक ऑनलाईन खरेदी करू शकतील. सदर पुस्तक प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत संदर्भ पुस्तक म्हणून देखील वापरता येऊ शकते. सदर पुस्तकाचे अग्रेषित श्री गुरु गोविंदसिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, नांदेड चे संचालक डॉ. वाय. व्ही. जोशी यांनी केले आहे. पुस्तका बद्दल त्यांनी लिहिले की "लेखकाने पुस्तक लिहिण्या करिता सोप्या इंग्रजी भाषेचा वापर केला असून पुस्तक वेगळ्या पद्धतीने लिहिले आहे".


*सदर पुस्तक थोर शास्त्रज्ञ व माझी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेले असल्या कारणाने त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रकाशित करण्यात आले.*


सदर पुस्तक प्रकाशित करतांना विद्यापीठाचे डॉ. एल. एम.वाघमारे(अधिष्ठाता स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठ नांदेड), डॉ. घनश्याम येळणे (संचालक सामाजिक शास्त्र संकुल स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठ नांदेड), श्री इंजि. तानाजी हुस्सेकर (प्रभारी अभियंता स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठ नांदेड) हे उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्या करता डॉ. घनश्याम येळणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. पुस्तक लिहितांना सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून आभार लेखकाने ह्या वेळी व्यक्त केले.


टिप्पण्या